Navi Mumbai | तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक माहिती उघड, रसायनांचा…
मुंबईकरांनो तुम्ही खात असलेले आंबे कृत्रिम आहेत असे म्हणले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असंच घडतंय नवी मुंबई येथे. नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबईकरांनो तुम्ही खात असलेले आंबे कृत्रिम आहेत असे म्हणले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण असंच घडतंय नवी मुंबई येथे. नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काही व्यापारी आंबे लवकर पिकवण्यासाठी केमिकल फवारणी करत असल्याचे निदर्शनास आले. अलीकडेच फळांमुळे झालेल्या आरोग्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक गंभीर मानला जात आहे.
ही माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आणि एपीएमसी प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बाजारात छापा टाकला. संशयित व्यापाऱ्यांकडून आंब्यांचे नमुने जप्त करण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून सुरक्षित अन्नपुरवठ्याबाबत प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
