संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!

संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!

| Updated on: Nov 07, 2026 | 2:46 PM

नवनाथ बण यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊतांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोलण्याऐवजी उद्धव ठाकरे गट काँग्रेसमध्ये कधी विलीन करणार याचा मुहूर्त सांगावा, असे बण म्हणाले. अजित पवार यांचा गटच मूळ राष्ट्रवादी असल्याचा दावा त्यांनी केला, तसेच राऊतांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.

नवनाथ बण यांनी संजय राऊत यांच्यावर त्यांच्या राजकीय वक्तव्यांवरून जोरदार टीका केली आहे. राऊत उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अनेक निर्णय घेत असल्याचा दावा बण यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये राऊतांनी अनावश्यक हस्तक्षेप करू नये, असे बण म्हणाले. याऐवजी राऊतांनी उबाठा गट काँग्रेसमध्ये कधी विलीन करणार, याचा मुहूर्त सांगावा असे आव्हान बण यांनी दिले.

सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत जो निर्णय घेतला आहे, त्याला भारतीय जनता पक्षाचे पूर्ण समर्थन असल्याचे बण यांनी स्पष्ट केले. शरद पवार स्वतः निर्णय घेण्यास सक्षम असून त्यांना संजय राऊत यांच्यासारख्या मध्यस्थाची गरज नसल्याचेही बण यांनी नमूद केले.

Published on: Nov 07, 2026 2:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us