Special Report | दाढीवाला काशिफ खानशी समीर वानखेडेंचा संबंध काय?
क्रूझवरील दाढीवाल्याचा व्हिडीओ ट्विट करुन नवाब मलिकांनी पुन्हा समीर वानखेडेंना घेरलंय. काशिफ खान समीर वानखेडेचा मित्र असून आतापर्यंत त्याच्यावर कारवाई झालेली नाही, असा आरोप नवाब मलिकांनी केला.
क्रूझवरील दाढीवाल्याचा व्हिडीओ ट्विट करुन नवाब मलिकांनी पुन्हा समीर वानखेडेंना घेरलंय. काशिफ खान समीर वानखेडेचा मित्र असून आतापर्यंत त्याच्यावर कारवाई झालेली नाही, असा आरोप नवाब मलिकांनी केला. तर काशिफ खानने ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना सर्व आरोप फेटाळले. आर्यन खान ड्रग्ज केस कशी फ्रॉड आहे हे समजण्यासाठी 3 व्यक्तींचे CDR तपासा, सगळा कार्यक्रम जगजाहीर होईल. क्रूझवर रेड झालीच नाही, त्याअगोदर कारवाई झाली, हे सगळ्यांसमोर येईल, असं नवाब मलिक म्हणाले होते. तसेच क्रूझवरच्या पार्टीत समीर वानखेडे यांचा दाढीवाला मित्र होता. त्यांनी त्याचं नाव जाहीर करावं, त्यांनी मित्राचं नाव जाहीर केलं नाही तर मी जाहीर करेन, असं मलिक म्हणाले होते. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
