महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच….  NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, धक्कादायक कृत्य समोर

महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच…. NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, धक्कादायक कृत्य समोर

| Updated on: May 17, 2026 | 12:15 PM

राष्ट्रावादी अजित पवार गटातील नेत्याबात आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. हा प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडला. विहामांडवा विभागात कार्यरत असलेल्या एका महिला मंडळ अधिकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवून मानसिक त्रास देणे, बदनामी करणे आणि थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका राजकीय पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज चावरे असे या आरोपीचे नाव आहे. तो स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष असल्याचे सांगत महिला अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणामुळे जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विहामांडवा येथील महिला मंडळ अधिकारी आपल्या पदावर कर्तव्य बजावत असताना आरोपी युवराज चावरे याने त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे अश्लील संदेश आणि व्हिडीओ पाठवण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, मी तुला रोज असाच मानसिक त्रास देणार अशी उघड धमकी दिली. “मला तुला पर्सनल भेटायचे आहे” असे आक्षेपार्ह मेसेजही तो पाठवायचा. या प्रकरणी महिला अधिकाऱ्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीची मुजोरी आणखी वाढली.

Published on: May 17, 2026 12:12 PM
Follow Us