भाषण करता करता अजितदादा चुकले अन् म्हणाले…

| Updated on: Jan 21, 2023 | 8:26 AM

अजित पवार म्हणाले, पण, कुणी माफी मागा म्हटले तर माफी मागायला मी मोकळा नाही, कारण...

Follow us on

सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून बोलण्याच्या ओघात एक चूक झाली पण ती लक्षात येताच त्यांनी ती सुधारली. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आहे, पण काही लोकं गोबेल्स नीती वापरतात आणि एखाद्याची बदनामी करतात. चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही बघितले असेल अनिल बाबर यांच्याबद्दल १०० कोटींचा आरोप झाला. नंतर ज्यांनी आरोप केला ते म्हणाले माझ्याकडे काही पुरावा नाही. पण, त्यांच्या आयुष्यातले काही वर्षे वाया घालविले. कोण भरून देणार आहे, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

पुढे ते म्हणाले, एवढ्यात अजित पवार यांच्या लक्षात एक चूक आली. आपण बोलण्याच्या ओघात अनिल देशमुख ऐवजी अनिल बाबर बोललो. बोलण्याच्या ओघात ही चूक झाली. असे त्यांनी भर सभेतचे सांगितले. बाबर हा शब्द मागे घेतो. अनिल देशमुख म्हणायचे होते. आपल्याला जे पटते ते बोलून टाकतो, असेही अजित पवार म्हणाले. पण, कुणी माफी मागा म्हटले तर माफी मागायला मी मोकळा नाही, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.