Vidhan Parishad Election | सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच…

Vidhan Parishad Election | सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच…

| Updated on: Apr 29, 2026 | 1:40 PM

विधान परिषदेवर कोणत्या पक्षातून कोणाला संधी मिळणार? याची मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान काहीसा कालावधी शिल्लक असतानाच सर्व पक्षांनी मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत.

सरासरीनुसार राष्ट्रवादी पक्षाकडे विधानपरिषदेची एक जागा आहे. या जागेवर नेमकं कोणाला निवडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं.

या जागेसाठीच राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने बैठक बोलावली होती. ती पार पडल्यानंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तटकरे म्हणाले, ‘कोअर कमिटीचा निर्णय जवळपास झालाच आहे, संध्याकाळपर्यंत आम्ही उमेदवाराचं नाव जाहीर करू. आम्ही सारासार विचार करून, गुणवत्ता तसेच प्रादेशिक तत्त्वांचा विचार करून नाव जाहीर करू.’ मात्र अलीकडील सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार आज संध्याकाळी त्या स्वतः उमेदवाराचं नाव जाहीर करणार आहेत. एका पदासाठी ७४ ते ७५ जण इच्छुक होते, अशी माहितीदेखील समोर येत आहे.

Published on: Apr 29, 2026 1:40 PM
Follow Us