Prashant Pawar : …अन्यथा लक्ष्मण हाके यांना निपटवून टाकू, ओबीसी नेत्याला कोणी दिली टोकाची धमकी?

Prashant Pawar : …अन्यथा लक्ष्मण हाके यांना निपटवून टाकू, ओबीसी नेत्याला कोणी दिली टोकाची धमकी?

| Updated on: Jun 05, 2025 | 2:40 PM

ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे सातत्याने अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर टीका करताना दिसताय. अशातच हाकेंनी केलेल्या टीकेनंतर प्रशांत पवार यांनी हाकेला थेट धमकी दिली आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आठ दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागावी, अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली आहे. लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांची माफी मागितली नाहीतर त्यांना निपटवून टाकू, असा इशाराच प्रशांत पवार यांनी दिलाय. प्रशांत पवार हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असून त्यांनी लक्ष्मण हाके यांना थेट धमकी दिली आहे. इतकंच नाहीतर लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते नाहीत असंही प्रशांत पवार यांनी म्हटलंय. तर जिथे लक्ष्मण हाके दिसतील तिथे त्यांना काळं फासू असा इशाराही प्रशांत पवार यांनी दिलाय.

अजित पवार कुठे आणि लक्ष्मण हाके कुठे? असा सवाल करत जनावराला जसं गोचीड चिकटून असतं तसं अजित पवार सत्तेतील अर्थ खात्याला चिटकून असल्याचे टीका लक्ष्मण हाके यांनी केली होती. यावर प्रशांत पवार यांनी पलटवार केलाय.

Published on: Jun 05, 2025 02:40 PM