Sharad Pawar : … हे योग्य नाही, माळेगाव कारखान्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, नेमकी भूमिका काय? अनौपचारिक चर्चांमध्ये म्हणाले…
माळेगाव साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी चार पॅनेल मैदानात उतरले आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा पॅनेल’, अजित पवार यांचे ‘निळकंठेश्वर पॅनेल’, शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांचे ‘सहकार बचाव पॅनेल’ आणि शेतकरी संघटनांचे पॅनेल यांच्यात लढत झाली.
बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सध्या चांगलीच चर्चा आहे. बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका असलेल्या या साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच माळेगाव कारखान्यावर शरद पवारांची नेमकी भूमिका काय? हे आता समोर आलं आहे. गेल्या ४० वर्षांपासून माळेगाव कारखाना माझ्या विचारांवर चालणारा होता. तर सत्तेतील लोकांनीच कारखान्याची निवडणूक लढवणं योग्य नसल्याचे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चांमध्ये हे मत व्यक्त केलंय. कारण सत्तेत बसलेली व्यक्ती कारखान्यावर असेल तर कारखान्यातील विरोधी गटाने एखादा मुद्दा उपस्थित केला तर कारखान्यातील सत्तेतील लोकं त्यांना न्याय देऊ शकत नाही, असंही शरद पवार म्हणाले.
Published on: Jun 24, 2025 04:08 PM
