NEET घोटाळ्याचं देशव्यापी जाळं उघड! राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
देशभरात 3 मे 2026 रोजी पार पडलेल्या NEET 2026 परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) तपास सोपवण्यात आल्यानंतर प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परीक्षा प्रणाली तात्पुरती स्थगित करण्यात आली आणि अखेर 3 मे रोजी घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, राजस्थान, हरियाणा, नाशिक, अहिल्यानगर आणि लातूर येथील काही संशयितांना अटक करण्यात आली असून, या पेपरफुटीमागे देशव्यापी रॅकेट कार्यरत असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे. काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. नाशिकहून राजस्थानपर्यंत आणि तेथून हरियाणापर्यंत पेपर पोहोचल्याचे तपासातून स्पष्ट होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या प्रकरणात आता राज्यातून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. बायोलॉजी विषयाच्या प्राध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या अटकेनंतर NEET पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता 9 वर पोहोचली आहे.
दरम्यान, CBI कडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या गंभीर प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.