NEET पेपरफुटीचे धागेदोरे थेट नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा पेपर

NEET पेपरफुटीचे धागेदोरे थेट नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा पेपर

| Updated on: May 17, 2026 | 11:44 AM

NEET 2026 परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत येऊन पोहचले आहेत. सीबीआयकडून (CBI) नांदेड शहरातील विद्युतनगर परिसरातील एका कुटुंबाची तब्बल 8 ते 9 तास चौकशी करण्यात आल्याचे समजते. या चौकशीमुळे NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कदम कुटुंबातील विद्यार्थिनीने यापूर्वी दोन ते तीन वेळा NEET परीक्षा दिली होती. मात्र, तिचा स्कोअर सातत्याने 120 च्या आसपास राहत होता. यंदा तिने पुण्यात 15 दिवसांचे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर तिचा स्कोअर थेट 560 पेक्षा अधिक गेल्याचे तपासात समोर आले आहे. या अचानक वाढलेल्या गुणांमुळे CBI ला संशय आला असून, तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला आहे.
कदम कुटुंबावर तब्बल 5 लाख रुपयांना NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, CBI कडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पेपरफुटी रॅकेटमागील मोठी साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: May 17, 2026 11:44 AM
Follow Us