NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव समोर, इथंच झाला सर्वात मोठा घोळ?

NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव समोर, इथंच झाला सर्वात मोठा घोळ?

| Updated on: May 13, 2026 | 11:42 AM

भारतातील लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा देतात. डॉक्टर होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. या वेळीही ३ मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर आरोपानंतर आता देशात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपानंतर आता ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे.

भारतातील लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा देतात. डॉक्टर होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. या वेळीही ३ मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर आरोपानंतर आता देशात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपानंतर आता ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे. दुसरीकडे या कथित पेपरफुटीतील आरोपी शुभन खैरनार याचा ताबा सीआयडीने घेतला आहे. त्याने पेपरफुटी प्रकरणात मध्यस्थाचे काम केले असा संशय आहे. त्याने पेपर १० लाखात घेऊन १५ लाखात विकला. इंस्टाग्रामवर शेअरिंग दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्याचं सांगितलं जात आहे. आता या प्रकरणात नवी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. नाशिक, ठाणे नंतर या प्रकरणात महाराष्ट्रातील आणखी एका नामांकित ठिकाणाचे नाव जोडले गेले आहे.

या प्रकरणाचं आता लातूर कनेक्शनही समोर आलं आहे. नीट विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीनंतर लातूरमधील एका खासगी क्लास संचालकाची चौकशी होणार आहे. या क्लासेसमधील 42 प्रश्न परीक्षेत आल्याचा दावा करण्यात आला आहे. हे प्रश्न परीक्षापूर्व मॉक टेस्टमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. एकूणच हे प्रकरण खूप चिघळल्याचं पाहायला मिळत आहे.

Published on: May 13, 2026 11:42 AM
Follow Us