दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ

दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ

| Updated on: Jul 25, 2026 | 2:39 PM

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलनात सहभागी झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या काही आंदोलकांनी अचानक घोषणाबाजी आणि धावपळ सुरू केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलनात सहभागी झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या काही आंदोलकांनी अचानक घोषणाबाजी आणि धावपळ सुरू केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करताना पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे काही काळ जंतर-मंतर परिसरात गोंधळाचे वातावरण होते. घटनेनंतर पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. दिल्लीत अचानक मोठ्या हालचाली घडत असल्याचं दिसत आहे.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, दिल्लीतील या घटनेमुळे नीट प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून विविध राजकीय पक्षांकडूनही यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Published on: Jul 25, 2026 2:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us