MNS : अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय? नेरूळ पोलिसांकडून अ‍ॅक्शन

MNS : अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय? नेरूळ पोलिसांकडून अ‍ॅक्शन

| Updated on: Nov 17, 2025 | 12:47 PM

मनसे नेते अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रीतसर परवानगी न घेता जमावबंदीचं उल्लंघन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. याबाबत गजानन काळे आणि सचिन अहिर यांनी अमित ठाकरेंचं कौतुक करत कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मनसे नेते अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं रीतसर परवानगी न घेता लोकार्पण केल्यामुळे जमावबंदीचं उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या कारवाईवर मनसे नेते गजानन काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, अमित ठाकरेंचा शिवभक्तांना आणि महाराष्ट्राला अभिमान आहे. दादर येथील कबुतरखान्याच्या बंदिस्त प्रकरणात जैन समुदायाने आंदोलन करून तो खुला केला, तरी त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित करत देवेंद्र फडणवीसांच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

तर सचिन अहिरांनीही अमित ठाकरेंच्या कृतीचं कौतुक केलं आहे. समाजासाठी गोष्टी करताना ठाकरे कुटुंब रस्त्यावर उतरत असल्याचा आरोप होतो, मात्र चार महिने पुतळ्याचं अनावरण होत नाही आणि महत्त्वाचे नेते केवळ कार्यक्रमांना उपस्थित राहतात, यावर त्यांनी टीका केली.

Published on: Nov 17, 2025 12:47 PM