Special Report | महाराष्ट्राच्या जनतेला संभ्रमात का ठेवतात ? -tv9

| Updated on: Jan 08, 2022 | 8:44 PM

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात नवी नियमावली जारी कऱण्यात आली आहे. या नियमावलीनुसार आता राज्यात अधिक कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. राज्यात नाईक कर्फ्यू लागू करण्यात आला असून रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कडक जमावबंदीचे निर्देश जारी करण्यात आले आहे.

Follow us on

राज्यात कोरोना रुग्णावाढीचा कहर सुरु आहे. राज्यात नव्या 41 हजारपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.05 इतका आहे. दरम्यान, 41 हजार 434 नव्या रुग्णांपैकी 20 हजारपेक्षाही जास्त नवे रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान ओमिक्रॉनचे 133 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात नवी नियमावली जारी कऱण्यात आली आहे. या नियमावलीनुसार आता राज्यात अधिक कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. राज्यात नाईक कर्फ्यू लागू करण्यात आला असून रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कडक जमावबंदीचे निर्देश जारी करण्यात आले आहे. या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरीकांनाच प्रवासाची आणि घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आले.