Nitesh Rane | नितेश राणे भास्कर जाधवांना सोंगाड्या का म्हणाले?

Nitesh Rane | नितेश राणे भास्कर जाधवांना सोंगाड्या का म्हणाले?

| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 8:05 PM

”भास्कर जाधव हा कुठला रोग आहे, हे कोकणातील लोकांना पहिल्या दिवसापासून माहिती आहे. तो सोंगाड्या आहे. नाटकामध्ये जसा नरकासूर जसा कुठलेही सोंग ठेवत नाही, वेगवेगळे सोंग बदलत असतो. तशी भास्कर जाधवांची अवस्था आहे” अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.

सिंधुदुर्ग : ”भास्कर जाधव हा कुठला रोग आहे, हे कोकणातील लोकांना पहिल्या दिवसापासून माहिती आहे. तो सोंगाड्या आहे. नाटकामध्ये जसा नरकासूर जसा कुठलेही सोंग ठेवत नाही, वेगवेगळे सोंग बदलत असतो. तशी भास्कर जाधवांची अवस्था आहे” अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. ”काल तो राष्ट्रवादीचा सोंगाड्या होता, आज तो शिवसेनेचा सोंगाड्या आहे. उद्या तो भाजपचा पण सोंगाड्या होईल. अशा सोंगाड्या लोकांना समाजात काय किंमत आहे? हे चिपळूणच्या आणि कोकणातल्या लोकांना विचारा.” असेही नितेश राणे म्हणाले आहेत.तसेच ”यांची कोकणामध्ये लायकी उरलेली नाही आहे. ज्या पंतप्रधानांचे जगामध्ये नाव आहे, जगामध्ये ज्यांची ओळख आहे, या सोंगाड्याला त्यांची काय किंमत कळणार? अशा सोंगाड्याना किती महत्व द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे.” अशी खरपूस टीका नितेश राणे यांनी केली आहे.