Special Report | म्याव म्याव..विधीमंडळाच्या पायऱ्यांवर नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं -Tv9

Special Report | म्याव म्याव..विधीमंडळाच्या पायऱ्यांवर नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं -Tv9

| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 8:36 PM

नितेश राणे यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन करताना आदित्य ठाकरे येताच म्याऊ म्याऊच्या घोषणा दिल्या आहेत. त्यावरूच आता पुन्हा वाद पेटला आहे.

मुंबई : आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नितेश राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा पहायला मिळाला कारण नितेश राणे यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन करताना आदित्य ठाकरे येताच म्याऊ म्याऊच्या घोषणा दिल्या आहेत. त्यावरूच आता पुन्हा वाद पेटला आहे. तसेच नितेश राणे शिवसेना नेते अनिल परब यांच्यातही जोरदार घमासान पहायला मिळाले. अनिल परबांच्या पोटात दुखलं मला विधानसभेत पुढे बसायला मिळाले म्हणून असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. राणीबागेत असणाऱ्या त्या फलकाबद्दल आणि दर्ग्याबद्दल मुंबई महापालिकेने तसंच शिवसेनेने स्पष्टीकरण दिले पाहिजे असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांना पाहून म्याऊ म्याऊ जाणीवपूर्वक केलं कारण वाघाची मांजर झाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे. याच घोषणा देताना तिघे भाऊ 100 कोटी वाटून घेऊ असे फलकही भाजप नेत्यांच्या हातात दिसून आले. पुढे सुरूवातील अनिल परब यांनी सुरूवातील आवाज उठवला मात्र नंतर ते तोंडावर पडले अशी टीका त्यांनी अनिल परब यांच्यावर केली आहे.