Laxman Hake : एक दिवस आधीच पोस्ट अन् दुसऱ्याच दिवशी गाडी फुटली, नेमके काय दिले होते संकेत?
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला झाला असून, तिघे अटकेत आहेत. या हल्ल्याला मनोज जरांगे यांनी स्टंटबाजी म्हटले, तर हाकेंनी पोलीस संरक्षणाचा हवाला देत आरोप फेटाळले.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगर येथे हल्ला झाला. या घटनेप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हाके यांनी हल्ल्याची शक्यता वर्तवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला. गाडीची काच आणि नंबर प्लेट तोडण्यात आली. या घटनेनंतर मनोज जरांगे यांनी हा हल्ला प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली स्टंटबाजी असल्याचे म्हटले. त्यांनी हाकेंवर मराठ्यांविरोधात काम करण्याचा आरोपही केला. या आरोपांना उत्तर देताना लक्ष्मण हाके यांनी आपल्यासोबत दोन पोलीस व्हॅन आणि दहा-बारा सशस्त्र पोलीस कर्मचारी असल्याचे सांगत, स्टंटबाजीचा आरोप फेटाळला. जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याचेही ते म्हणाले. हल्ल्यामुळे आपली लढाई थांबणार नाही, तर ओबीसी आरक्षणासाठी शेवटच्या घटकापर्यंत लढणार असल्याचे हाकेंनी स्पष्ट केले आहे.
Published on: Sep 28, 2025 11:29 AM
