मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी… ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
उबाठा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवमधील नगरसेवकांशी संवाद साधला.
ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकरांबाबत भाष्य करताना, “मी त्यांच्यावर टीका करणार नाही. तो आपल्यातच होता,” असे म्हटले. आपल्याला पुढे लढायचे आहे, असे सांगत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना “तुम्ही मनापासून इथे आहात ना?” असा सवालही विचारला. ते म्हणाले की, मी जेव्हा दौऱ्यावर आलो होतो, तेव्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये चांगला उत्साह होता आणि तोच उत्साह कायम ठेवा.
शिवसेना ही तळपती तलवार आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे, असेही त्यांनी अधोरेखित केले. धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो अबाधित ठेवा, असे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले. कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसारखे जनतेचे प्रश्न वारंवार मांडावेत, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीमध्ये सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी पुढील वाटचालीसंदर्भात सूचना दिल्या.
