tv9 Marathi Special Report | कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला ग्रीन सिग्नल?

tv9 Marathi Special Report | कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला ग्रीन सिग्नल?

| Updated on: May 28, 2026 | 10:02 AM

कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जवळपास पाऊण तास चाललेल्या बैठकीत केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारने सध्या कांद्याचा 15 रुपये 80 पैसे दर निश्चित केला असून या दरात आणखी वाढ करण्यास अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच आतापर्यंत प्रस्तावित असलेल्या 2 लाख टनांऐवजी तब्बल 10 लाख टन कांदा खरेदी करण्याबाबतही केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघामार्फत ही खरेदी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत केली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणीवपूर्वक कांदा नाकारण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणलं जाईल, अशी माहिती दिली. तसेच व्यापाऱ्यांकडून नव्हे तर थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी होईल याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नसल्याचं सांगत मोठ्या प्रमाणात कांद्याच्या बियाण्यांची निर्यात सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचंही बैठकीनंतर सांगण्यात आलं.

Published on: May 28, 2026 9:57 AM
Follow Us