Ajit Pawar | बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका, अजितदादांचा शेतकरी वर्गाला सल्ला

Ajit Pawar | बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका, अजितदादांचा शेतकरी वर्गाला सल्ला

| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 2:34 PM

शेतकऱ्यांच्या घराघरातील वादाचं मूळ हे जमीन असल्याचं सांगितलं. त्यामुळे वाद करत बसू नका, तुम्हाला कोर्टात जाईपर्यंत सगळे गोड बोलतील. नंतर त्रास होईल. त्यामुळं कोर्टाची पायरी चढू नका. असा सल्ला अजित पवार यांनी दिलाय.

“सद्यस्थितीत जमीन ही घराघरातील वादाचे मूळ आहे. हे वाद कायमस्वरुपी मिटावेत अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका” असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. बारामतीत डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या घराघरातील वादाचं मूळ हे जमीन असल्याचं सांगितलं. त्यामुळे वाद करत बसू नका, तुम्हाला कोर्टात जाईपर्यंत सगळे गोड बोलतील. नंतर त्रास होईल. त्यामुळं कोर्टाची पायरी चढू नका. असा सल्ला अजित पवार यांनी दिलाय. आमच्या लहानपणी तलाठी अर्थात भाऊसाहेबांचाच थाट असायचा. त्याकाळी काहींनी कुणाच्याही जमिनी कुणाच्याही नावावर करण्याचे उद्योग केल्याचा किस्सा यावेळी अजित पवार यांनी सांगितला.