उस्मानाबादेत आमरण आंदोलन पेटलं, आमदार कैलास पाटील यांची प्रकृती खालावली, आज पाचवा दिवस

| Updated on: Oct 28, 2022 | 2:24 PM

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय. मात्र सरकारने मदत केली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

Follow us on

संतोष जाधव, उस्मानाबादः शेतकऱ्यांना हक्काचा 2020 चा पीक विमा मिळावा व अतिवृष्टी अनुदान मिळावे या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांच्या नेतृत्वात उस्मानाबादेत (Osmanabad) आंदोलन पेटलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार कैलास पाटील यांनीदेखील आमरण उपोषणात सहभाग घेतला आहे. या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. जिल्ह्यातील पाडोळी गावातील जवळपास २५ शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केलं आहे. शेतकऱ्यांनी पाडोळी येथील तलावात उभे राहून हे आंदोलन सुरु केलंय. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय. मात्र सरकारने मदत केली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.