श्रावणबाळ चालले आईला घेऊन विठ्ठलाच्या भेटीला!

| Updated on: Jul 08, 2022 | 11:41 AM

यावर्षी तब्बल 2 वर्षांनी पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) पार पडतीये. वारीत माऊलींची गर्दीच गर्दी पाहायला मिळतीये.

Follow us on

Pandharpur Wari 2022: यंदा 10 जुलैला पार पडणार्‍या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 20 जूनला देहू मधून संत तुकाराम (Sant Tukaram) महाराजांची आणि 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघाली. यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. वारी करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये (Pandharpur) दाखल होणार आहेत. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो. यावर्षी तब्बल 2 वर्षांनी पंढरपूरची वारी (Pandharpur Wari) पार पडतीये. वारीत माऊलींची गर्दीच गर्दी पाहायला मिळतीये. दरम्यान या वारीत एक विशेष गोष्ट पाहायला मिळतीये, एक श्रावणबाळ आपल्या आईला विठूरायाच्या भेटीला घेऊन चाललाय. बघा..