Beed | देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांचा बीड दौरा रद्द, सूत्रांची माहिती

| Updated on: Oct 03, 2021 | 6:37 PM

फडणवीस यांनी काल आणि आज हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, फडणवीस आणि दरेकर यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द झाल्याची माहिती मिळतेय.

Follow us on

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी ढगफुटीसदृश्य पावसामुळं पुरता उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांनी काल आणि आज हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र, फडणवीस आणि दरेकर यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द झाल्याची माहिती मिळतेय. भाजप नेत्या पंकजा मुंडे आजारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांचा दौरा रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या घशात फोड आले असून त्यांना डॉक्टरांनी आगामी चार दिवस बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुंडे यांना घशामध्ये फोड तसेच टॉन्सिल्सचाही त्रास सुरु झाला आहे. आगामी चार दिवसांत पंकजा मुंडे कोणालाही भेटणार नाहीत. तसेच त्या कोणाचेही कॉल स्वीकारणार नाहीत. 1 ऑक्टोबर रोजी ट्विट करत पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली होती.