Delhi Fuel Hike | देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने खळबळ तर, राजधानी नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल किती रुपयांनी महाग?

| Updated on: May 15, 2026 | 11:53 AM

देशभरातील नागरिकांना आज सकाळीच महागाईचा मोठा धक्का बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देशभरात तब्बल 3 रुपयांची वाढ करण्यात आली असून, नवीन दर आज सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाले आहेत. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 3 रुपये 14 पैशांची वाढ झाली असून, पेट्रोलचा दर आता 97 रुपये 97 पैशांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर 90 रुपये 67 पैशांवर गेला आहे. याशिवाय, सीएनजीच्या दरातही 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
इराण-अमेरिका संघर्ष आणि मध्य पूर्वेतील अस्थिर परिस्थितीमुळे जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा थेट परिणाम आता भारतातील इंधन दरांवर दिसून येत आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

Published on: May 15, 2026 11:53 AM
Follow Us