मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?

मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 07, 2026 | 3:40 PM

दिल्लीमधून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. संसद भवनात झालेल्या या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक तासापेक्षा अधिक वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांच्या वडिलांच्या प्रकृतीची तसेच त्यांच्या नातवाचीही आवर्जून विचारपूस केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ही भेट केवळ राजकीय चर्चेपुरती मर्यादित न राहता कौटुंबिक संवादानेही विशेष ठरल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या खासदारांसोबत ब्रेकफास्ट बैठकही घेतली. या बैठकीचा फोटो आता समोर आला असून, संसद भवनात झालेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील विविध प्रश्न, मतदारसंघातील विकासकामे तसेच आगामी राजकीय घडामोडींशी संबंधित महत्त्वाच्या आणि विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, बैठकीतील नेमका अजेंडा आणि कोणत्या मुद्द्यांवर अंतिम चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत झालेली ही बैठक महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, या बैठकीनंतर कोणते राजकीय संकेत मिळतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 07, 2026 3:40 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us