Delhi Lal Quila Blast : PM मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल झाले अन्..

Delhi Lal Quila Blast : PM मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल झाले अन्..

| Updated on: Nov 12, 2025 | 9:16 PM

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातील जखमींची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलएनजेपी रुग्णालयाला भेट दिली. या स्फोटात २५ ते ३० जण जखमी झाले होते. पंतप्रधान मोदींनी जखमींशी संवाद साधून त्यांना सरकार पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. केंद्रीय सुरक्षा समितीची बैठकही आज संध्याकाळी होणार आहे.

दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर जखमींची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलएनजेपी रुग्णालयाला भेट दिली. परवा संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी गेट क्रमांक एकजवळ झालेल्या या स्फोटात जवळपास पंचवीस ते तीस जण जखमी झाले होते. पंतप्रधान मोदींनी रुग्णालयात जाऊन जखमींवर उपचार सुरू असलेल्या ठिकाणी त्यांची विचारपूस केली आणि त्यांना सरकार पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. यापूर्वी स्फोटानंतर त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही रुग्णालयात जात जखमींची तात्काळ विचारपूस केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे आपल्या संवेदना व्यक्त केल्या होत्या आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे ठासून सांगितले होते. आज संध्याकाळी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक देखील होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भूतानच्या दौऱ्यावर होते, तिथून परतल्यानंतर त्यांनी थेट एलएनजेपी रुग्णालय गाठले. त्यांनी जखमींशी थेट संवाद साधून स्फोटाबाबतची माहिती जाणून घेतली. भूतानमधील भाषणातही त्यांनी दोषींना सोडले जाणार नाही असे स्पष्ट केले होते.

Published on: Nov 12, 2025 09:15 PM