Task Force | परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
देशातील परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि तांत्रिक सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेत तांत्रिक आणि संरचनात्मक बदल करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी आधारचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि भविष्यात पेपरफुटीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजनांवर काम करण्यात येणार आहे.
या समितीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ, गुप्तचर विभागाचे (IB) माजी संचालक तपन डेका, आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामाकोठी, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ अमृतलाल मीना यांचाही या टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात आला आहे.
परीक्षा व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे, पारदर्शकता वाढवणे आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने ही टास्क फोर्स लवकरच आपल्या कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.