Operation Sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक
PM Narendra Modi : पहलगाम हल्ल्याचा बदला आज भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला आहे. तिन्ही दलांनी एकत्रित केलेल्या या कारवाईचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्व लष्कराचं कौतुक करण्यात आलेल आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. संपूर्ण तयारीने हल्ला केला. देश तुमच्यासोबत आहे, असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. यानंतर मोदींनी या हल्ल्याची माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कॅबिनेटची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मोदींनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, याच संदर्भात उद्या सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता संसदेत ही बैठक होणार आहे. अमित शाह, राजनाथ सिंग, किरेन रिजिजू हे या बैठकीला उपस्थित असणार आहेत.
Published on: May 07, 2025 4:19 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
