PM Narendra Modi on Iran- Israel War | इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम? मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं!

PM Narendra Modi on Iran- Israel War | इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम? मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं!

| Updated on: Mar 23, 2026 | 3:46 PM

इराण आणि अमेरिकेतील युद्धाचा परिणाम भारतावरही झाला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि नागरिक उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी याबाबतची सर्व माहिती दिली आहे.

इराण आणि अमेरिकेतील युद्धाचा परिणाम भारतावरही झाला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि नागरिक उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी याबाबतची सर्व माहिती दिली आहे. या संकटाला तीन आठवडे उलटून गेले असून, त्यातून लवकरात लवकर मार्ग काढणे आवश्यक आहे, असा संदेश पंतप्रधानांनी दिला. मोदी यांनी सांगितले की, युद्धामुळे भारतासमोर अचानक समस्या निर्माण झाल्या आहेत, आणि हे संकट लवकर संपावे, हा संदेश जगातील सर्व देशांना द्यावा. तसेच परदेशातून भारतात सुरक्षित परतलेले नागरिक आणि युद्धाने प्रभावित देशातील भारतीयांना सतत मदत केली जात आहे. प्रत्येक भारतीयाचे संरक्षण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Mar 23, 2026 03:46 PM
Follow Us