खबरदार; सार्वजनिक ठिकाणी भीक मागालतर… हे नागपुरात चालणार नाही

| Updated on: Mar 09, 2023 | 9:10 AM

चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आहेत.

Follow us on

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत सध्या भीक मागणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात नागरिकांकडून वारंवार सरकारचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं जात. मात्र कोणतेच ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. मात्र आता शहरात वाहतूक सिग्नल व रस्त्याच्या कडेला तसेच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी उभे राहून भीक मागताच येणार नाही. नागपूर पोलिसांना या भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आहेत. जी-२० च्या पार्श्वभूमीवर हे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. तर अगोदरच शहरातील अनेक भिकारी बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील चौकांमधील उपद्रव नियंत्रणात यावा, यासाठी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.