शिंदे गटाकडून सुप्रिया सुळेंचा फोटो ट्विट, राष्ट्रवादी आक्रमक; शितल म्हात्रेंविरोधात तक्रार दाखल

शिंदे गटाकडून सुप्रिया सुळेंचा फोटो ट्विट, राष्ट्रवादी आक्रमक; शितल म्हात्रेंविरोधात तक्रार दाखल

| Edited By: | Updated on: Sep 24, 2022 | 10:25 AM

राष्ट्रवादीकडून शुक्रवारी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला होता. त्यानंतर आता शिंदे गटाकडून सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्या मागे मुख्यमंत्र्यांचा बोर्ड दिसत आहे.

मुंबई :  सध्या मुख्यमंत्र्यांच्या (CM) खुर्चीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीकडून (NCP) शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला होता. हा फोटो ट्विट करून श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता. यावरून वाद निर्माण झाल्यानं श्रीकांत शिंदे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण देखील दिले होते. मात्र आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी देखील खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. फोटो ट्विट करत ‘हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ? असा सवाल त्यांनी केला आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच आक्रमक झाले असून, हा फोटो बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात राष्ट्रवादीच्या वतीने म्हात्रेंविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

 

Published on: Sep 24, 2022 10:25 AM