Uddhav Thackeray : कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं

Uddhav Thackeray : कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं

| Updated on: Dec 11, 2025 | 9:28 PM

जस्टीस स्वामीनाथन यांच्यावरील महाभियोगावरून महाराष्ट्र्रात राजकीय वाद पेटला आहे. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कोण होतास तू, काय झालास तू? असा टोला लगावला. ठाकरेंनीही पलटवार करत मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि अमित शहांना गोमांस खाणाऱ्या मंत्र्यावरून लक्ष्य केले.

महाराष्ट्र्राच्या राजकारणात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा जोरदार वाद पेटला आहे. मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टीस स्वामीनाथन यांच्यावरील महाभियोग प्रकरणावरून हा वाद सुरू झाला. या प्रकरणावर ठाकरेंच्या खासदारांनी सह्या केल्याने अमित शहांनी लोकसभेत उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तो व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत ठाकरेंना कोण होतास तू, काय झालास तू? असा टोला लगावला. या टीकेला उद्धव ठाकरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाऱ्यांचे पांघरूण घालण्याचा आरोप करत पांघरूण मंत्री पद निर्माण करण्याचा सल्ला दिला. तसेच, अमित शहांना हिंदुत्वावरून लक्ष्य करत, त्यांच्या मंत्रिमंडळातील गोमांस खाणारे मंत्री किरण रिजिजू यांच्यासोबतच्या फोटोचा उल्लेख करत शहांना रिजिजू यांना मंत्रिमंडळातून काढण्याचे आव्हान दिले. एकीकडे गोडवे गाऊन दुसरीकडे टीका करण्याच्या दुटप्पी भूमिकेवरही ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या घटनेमुळे महाराष्ट्र्रातील राजकीय वातावरण तापले आहे.

Published on: Dec 11, 2025 09:28 PM