Prafull Patel | ब्लॅक बॉक्स खराब, तरी…समजू शकते अजितदादांच्या अपघाताचे कारण, प्रफुल्ल पटेलांनी दिली महत्त्वाची माहिती!

Prafull Patel | ब्लॅक बॉक्स खराब, तरी…समजू शकते अजितदादांच्या अपघाताचे कारण, प्रफुल्ल पटेलांनी दिली महत्त्वाची माहिती!

| Updated on: Feb 18, 2026 | 4:15 PM

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. डॅमेज झालेल्या ब्लॅक बॉक्सच्या डिकोडिंगबाबत बोलताना त्यांनी अमेरिकेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे म्हटले. प्रफुल पटेल म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी स्वायत्त संस्थेकडून होत असून त्यामध्ये आमच्यापैकी कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. डॅमेज झालेल्या ब्लॅक बॉक्सच्या डिकोडिंगबाबत बोलताना त्यांनी अमेरिकेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे म्हटले. प्रफुल पटेल म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी स्वायत्त संस्थेकडून होत असून त्यामध्ये आमच्यापैकी कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. संबंधित संस्थेचा अहवाल योग्य वेळी जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ब्लॅक बॉक्स डॅमेज झाल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना पटेल म्हणाले, “नेमकं काय घडलं हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र अमेरिकेत अशा अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत की, ब्लॅक बॉक्स नुकसानग्रस्त असला तरी त्याचे डिकोडिंग करण्यासाठी त्यांच्याकडे उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य उपलब्ध आहे.” त्यामुळे या तांत्रिक प्रक्रियेमुळे अपघातासंबंधी अधिक माहिती समोर येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या वक्तव्यानंतर अपघाताच्या चौकशीबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Published on: Feb 18, 2026 04:14 PM