Pramod Jathar | नारायण राणेंना अटक करण्याची हिंमत नाही : प्रमोद जठार

Pramod Jathar | नारायण राणेंना अटक करण्याची हिंमत नाही : प्रमोद जठार

| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 10:01 AM

स्वातंत्र्य दिन कधी आहे हे मुख्यमंत्र्यांनी विचारणं म्हणजे अपमान आहे का?. त्याला राणेंनी ठाकरी भाषेत उत्तर दिलं. आता मुख्यमंत्र्यांनी ठाकरी भाषेत उत्तर द्यावं. मुख्यमंत्र्यांनी देशाचा अपमान केला, त्याला राणेंनी उत्तर दिलं.

स्वातंत्र्य दिन कधी आहे हे मुख्यमंत्र्यांनी विचारणं म्हणजे अपमान आहे का?. त्याला राणेंनी ठाकरी भाषेत उत्तर दिलं. आता मुख्यमंत्र्यांनी ठाकरी भाषेत उत्तर द्यावं. मुख्यमंत्र्यांनी देशाचा अपमान केला, त्याला राणेंनी उत्तर दिलं. ठाकरी भाषेत उत्तर द्या. दसरा मेळाव्यात अशी वक्तव्य केली होती..  आर आर पाटलांनी कोपरा पासून ढोपरापर्यंतची भाषा केली होती. त्यामुळे उत्तर द्यायचं असेल तर ठाकरे भाषेत द्या, असं प्रमोद जठार म्हणाले.

सरकार सूडबुद्धीने काम करत आहे. कालच्या दौऱ्यात आम्ही हॉल किंवा जागा निश्चित करत होतो, त्या जागाही मिळत नव्हत्या. राणेसाहेबांचा आज आणि उद्या रत्नागिरीची दौरा असताना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची मुद्दाम बैठक लावली. ते राणे साहेबांच्या बैठकीला जाऊ नयेत म्हणून. नारायण राणे जे बोलले ते ठाकरी भाषेत बोलले. या ठाकरी भाषेवर गुन्हा दाखल करायचे असतील तर प्रत्येक दसरा मेळाव्यातील भाषणावर गुन्हा दाखल करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी ठाकरे भाषेत उत्तर द्यावं.

राणेसाहेब किंवा भाजपला शिवसेना किंवा सरकार रोखू शकत नाही. जन आशिर्वद यात्रा संपूर्ण हिंदुस्थानात फिरत आहे. राणेसाहेब 70 पेक्षा जास्त वयाचे असताना पूरग्रस्तांपर्यंत पोहोचत आहेत. राणेसाहेबांना घाबरत आहे. राणे साहेबांना अटक झाली तर भाजपचे सर्व कार्यकर्ते अटक करुन घेतल्याशिवाय राहणार नाही.