Rohini Khadse : रोहिणी खडसेंवर गुन्हा दाखल होणार? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी महत्त्वाची अपडेट काय?
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणासंदर्भात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे शक्यता आहे. बघा काय आहे अपडेट?
पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणासंदर्भातील पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याचा गंभीर आरोप रोहिणी खडसें यांच्यावर करण्यात आला आहे. आपल्या पतीला पाठिशी खालण्यासाठी रोहिणी खडसे यांनी पुराव्याची छेडछाड केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान रोहिणी खडसे यांच्यावर केवळ आरोपच नाही तर त्यांच्या अडचणी वाढून त्यांच्यावर गुन्हा ही दाखल होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीमध्ये रंगेहात पकडले. यानंतर त्यांच्यावर गंभीर आरोप होत असताना प्रांजल खेवलकर यांना चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात अडकवले गेले असून यामागे षडयंत्र असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलं होतं. इतकंच नाहीतर आपल्या पतीसाठी रोहिणी खडसे यांनी थेट कोर्टात धाव घेतल्याचेही पाहायला मिळाले होते. मात्र आता त्यांच्याच अडचणीत वाढ होण्याची चर्चा होतेय.
