हवेत तीर मारणं सुरू, कर नाही तर डर कशाला,  मी चौकशीला घाबरत नाही : प्रवीण दरेकर

हवेत तीर मारणं सुरू, कर नाही तर डर कशाला, मी चौकशीला घाबरत नाही : प्रवीण दरेकर

| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 5:03 PM

आमची बॅंक ही अ वर्ग असणारी आहे.  ज्या पिटीशन आहेत त्या कोर्टाने डिसमिस केलेले आहेत आपल्याकडे न्यायव्यवस्थेच्या पलीकडे काही नाही, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.   

मुंबई जिल्हा बँकेच्या संदर्भात काही वर्तमान पत्रात आणि काही चॅनेल मध्ये सतत बातम्या येत होत्या. एक वर्तमान पत्र आणि एक चॅनेल ठरवून बातम्या चालवत आहेत.
आवाज उठवणारा दरेकर आणि आता कुठे गायब असा आरोप होत आहे, पण मी कुठेही गेलेलो नाही.  एक चॅनेल वेगळ्या बातम्या दाखवल्या गेल्या पण ठेवीदारांचा आमच्यावर विश्वास आहे.  सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे 123 कोटी घोटाळा हा कुठून आणला हे आम्हाला समजलं नाही.  सात मुद्याद्वारे मी समजावून सांगणार आहे.
आमची बॅंक ही अ वर्ग असणारी आहे.  ज्या पिटीशन आहेत त्या कोर्टाने डिसमिस केलेले आहेत आपल्याकडे न्यायव्यवस्थेच्या पलीकडे काही नाही, असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.

मजूर संस्थांना सभासद करणं आणि किती जणांना सभासद करणं याबाबत नियम नाही.  डिजस्टर रिकव्हरी साईट गैरप्रकाराणे केलं असं बोललं जातं आहे तर आम्ही सर्वाना उत्तर दिलेली आहेत.  शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे हे माझे राजकीय विरोधक आहेत.  प्रकाश सुर्वे यांनी केवळ राजकीय सुडापोटी चौकशी करून काही हाती लागतय का हे बघत आहेत.  प्रकाश सोळंकी यांच्याकडूव जाणीवपुर्वक आमची चौकशी लावून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला.  पण यातून काहीच साध्य झाल नाही, मी इतरांना जसा विरोध करतो तसा मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. यांचे हवेत तिर मारणं सुरू आहे. कर नाही तर डर कशाला मी चौकशीला घाबरत नाही, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.