मध्यरात्री काळाचा घाला, कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी बसचा भीषण अपघात; चौघे ठार तर…

मध्यरात्री काळाचा घाला, कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी बसचा भीषण अपघात; चौघे ठार तर…

Harshada Shinkar | Updated on: Apr 23, 2023 | 8:03 AM

VIDEO | कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, कुठं घडली दुर्दैवी घटना

पुणे : कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. मालवाहू ट्रक बसवर आदळल्याने हा अपघात झाला. पुणे-बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याजवळ झालेल्या या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत. खासगी बसमधून रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर काळानं घाला घातल्यानं ही दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात. रात्री 2:15 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. मध्यरात्री सर्व प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत असतानाच हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चार जणांचे मृतदेहही ताब्यात घेतले असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Published on: Apr 23, 2023 8:01 AM
Follow Us