उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ

उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ

| Updated on: Aug 23, 2026 | 3:05 PM

उत्पादनातील घट, वाहतूक खर्च वाढल्यानं सुकामेवा महागलाय. बदाम पिस्त्याच्या दरात किलोमागे 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. बाजारपेठेमध्ये आवक घटल्याने ड्रायफ्रुटच्या किंमतीमध्ये शंभर ते तीनशे रुपये किलोमागे वाढ झालेली आहे. आपण पुण्यातील जे बाजारपेठ आहे, मार्केट यार्ड येथे आहोत. आपण पाहू शकतो खरंतर जी मोठी दरवाढ झाली असली तरी सणासुदीचा काळ आहे. या सणासुदीच्या काळामध्ये जे […]

उत्पादनातील घट, वाहतूक खर्च वाढल्यानं सुकामेवा महागलाय. बदाम पिस्त्याच्या दरात किलोमागे 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. बाजारपेठेमध्ये आवक घटल्याने ड्रायफ्रुटच्या किंमतीमध्ये शंभर ते तीनशे रुपये किलोमागे वाढ झालेली आहे. आपण पुण्यातील जे बाजारपेठ आहे, मार्केट यार्ड येथे आहोत. आपण पाहू शकतो खरंतर जी मोठी दरवाढ झाली असली तरी सणासुदीचा काळ आहे. या सणासुदीच्या काळामध्ये जे ग्राहक आहेत, हे ड्रायफ्रुट खरेदी करण्यासाठी येत आहेत. एकंदरीतच बदाम आणि पिस्त्याच्या दरात किलोमागे 300 रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे. पिस्त्याची आवक आहे, ही निम्म्यावर आलेली आहे. सणासुदीमुळे जी मागणी आहे, ती वाढली आहे. उत्पादनातील जी घट आहे, वाहतूकीत खर्च, वाढ आणि सौदे टप्प्याटप्प्याने होत असल्याने गेल्या 15 दिवसांत बदाम-पिस्ता आणि काजूच्या दरात किलोमागे 100 ते 300 रुपयांची एकंदरीत वाढ झालेलं पाहावयास मिळत आहे.

Published on: Aug 23, 2026 3:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us