खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच… डोकं चक्रावणारा खुलासा
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोहगड येथे फिरायला गेल्यानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी मिळून केतन अग्रवाल याला 400 फूट खोल दरीत ढकलले. या घटनेत केतनचा मृत्यू झाला.
तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया गोयल हिने यापूर्वीही केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना समजले आहे. मात्र त्यावेळी केतनने झाडाला पकडल्यामुळे त्याचा जीव वाचला होता.
दरम्यान, सिया गोयल हिने लग्नासाठी नकार दिला होता का? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. सियाने आपण लग्नास तयार नसल्याचे सांगितले होते, असा दावा केला आहे. याबाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी तिच्या भावाचा जबाब नोंदवला असून सियाचा भाऊ आणी प्रियकर हे दोघे मित्र असल्याचं सांगतिलं जात आहे. त्या दोघांच्या अफेर विषयी कल्पना असवी अशी चर्चा आहे. पुढील तपास सुरू आहे. केतनच्या वडिलांनी नुकतीच मुख्मंत्र्यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे..
