युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ

युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ

राखी राजपूत | Updated on: Mar 10, 2026 | 10:19 AM

अमेरिका-इराण युद्धाचा पुण्यातील ड्रायफ्रूट बाजाराला मोठा फटका बसला आहे. आखाती देशांतून येणाऱ्या पिस्ता, खजूर, मनुक्याच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सणासुदीच्या दिवसांत भाववाढीचा परिणाम जाणवत असून, युद्ध लांबल्यास २५-३० टक्क्यांपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता आहे.

पुण्यात अमेरिका-इराण युद्धाचा ड्रायफ्रूटच्या बाजाराला मोठा फटका बसला आहे. आखाती देशांतून आयात होणाऱ्या ड्रायफ्रूटच्या किमतीमध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पिस्ता, खजूर आणि मनुक्याच्या किमती वाढल्याचे दिसून येत आहे. सणासुदीचे दिवस असल्याने या भाववाढीचा परिणाम ग्राहकांवर थेट होत आहे.

गल्फ कंट्रीजमधून भारतात मोठ्या प्रमाणात खजूर, काळा मनुका, अंजीर आणि पिस्ता यांसारखे ड्रायफ्रूट्स येतात. या आयातीची पूर्वतयारी साधारणतः दोन महिने आधी केली जाते. सध्या भारताकडे चार महिन्यांचा ड्रायफ्रूटचा साठा उपलब्ध आहे. मात्र, युद्धाची सद्यस्थिती पाहता आणि ते लवकर संपण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

सध्या १० ते १५ टक्क्यांनी दर वाढले असले, तरी जर अमेरिका-इराण संघर्ष आणखी एक महिना लांबला, तर ड्रायफ्रूट्सच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे येत्या काळात ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागतील असे दिसते.

Published on: Mar 10, 2026 10:19 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us