Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह

Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह

| Updated on: Oct 03, 2026 | 3:05 PM

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुटखा माफिया आणि विक्रीविरोधात तीव्र आंदोलन केले. पोलिसांकडे दीड महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने मनसेने हा प्रतीकात्मक निषेध नोंदवला. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुटखा माफिया आणि त्याच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात डेक्कन परिसरात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांनी गुटखा माफियाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून शाही व जोडेमारो आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि तुकाराम मुंडे यांच्याकडे गुटखा माफियांबाबत नावासह यादी देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. चाकण आणि कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला जात असूनही, मुख्य माफियांपर्यंत कारवाई पोहोचत नसल्याचे मनसेने म्हटले आहे. हा गुटखा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातून येत असल्याचा दावाही कार्यकर्त्यांनी केला.

जर या गुटखा माफियांवर तातडीने मकोकाअंतर्गत कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायदा हातात घेईल आणि त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेने दिला आहे. विशेषतः लहान मुले आणि महाविद्यालयीन तरुण गुटख्याच्या आहारी जात असल्याने, महिला पदाधिकाऱ्यांनीही यावर कठोर कारवाईची मागणी केली.

Published on: Oct 03, 2026 3:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us