Pune : तगडी सुरक्षा, महागडे कॅमेरे तरीही वस्तू गायब कशा? पुण्याचा झुमरचोर नेमका आहे तरी कोण?
पुण्यात शहरात महापालिका आयुक्तांचा सरकारी बंगला सुरक्षित नाही कारण आलिशान आणि अतिशय सुरक्षा व्यवस्था असलेल्या या बंगल्यातनं २० लाखांच्या वस्तू चोरीला गेल्यात. धक्कादायक म्हणजे याची कोणतीही तक्रार न करता पुणे महापालिकेने आता नव्या वस्तूंसाठी टेंडर सुद्धा काढलंय.
पुण्यात सामान्यांची घरपट्टी भाडेपट्टी थकल्यावर महापालिका लगेच नोटीस धाडते पण एका सरकारी बंगल्यातूनच २० लाखांचं साहित्य गायब होऊनही महापालिकेने साधी तक्रारही दिलेली नाही. धक्कादायक म्हणजे महागड्या वस्तू कोणी ऐर्या गैर्याच्या घरातून नाही तर थेट पुणे महापालिका आयुक्तांच्या सरकारी बंगल्यातून गायब झाल्यात. गायब वस्तूमध्ये चार मोठ्या क्षमतेचे एसी, एक आलिशान झुंबर, दुर्मिळ असे ऐतिहासिक पेंटिंग आणि इतर काही महागड्या पेंटिंग, जुन्या काळातले पितळी आणि काशाचे दिवा, दोन मोठे हाय डेफिनेशन क्वालिटी एलईडी टीव्ही, कॉपी बनवण्याचे यंत्र, वॉकीटॉकीचे सेट, किचन मधला सेट, महागड्या रिमोट बेल्ट आणि वॉटर प्यूरीफायरचा सुद्धा समावेश आहे. यावरून पुण्यातल्या मनसेनिकांनी बैठकीत शिरून पुणे पालिका आयुक्तांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी दोन्ही बाजूंना आक्षेपार्ह शब्दांचा वापर झाल्याचा आरोप होतोय. बघा नेमकं काय घडलंय?
