…म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची खरमरीत पोस्ट
दरवर्षी लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा घेतात. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच डॉक्टर होण्यासाटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. यावेळीही 3 मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे समोर आले आहे.
दरवर्षी लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा घेतात. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच डॉक्टर होण्यासाटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. यावेळीही 3 मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर आरोपानंतर आता देशात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपानंतर आता ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे. दुसरीकडे या कथित पेपरफुटीचा तपासही चालू करण्यात आला आहे. दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, लाखो विद्यार्थ्यांची मेहनत भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे वाया गेली. हा प्रकरा अयोग्य व्यवस्थेमुळे घडला, म्हणून पेपरफुटीला भाजपच कारणीभूत आहे. पुढे राहुल गांधी यांनी, हे फक्त अपयश नसून तरुणांच्या भविष्य विरोधात केलेला गुन्हा आहे. असा घाणाघात केला आहे.
