Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा

Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा

| Updated on: Nov 23, 2026 | 12:53 PM

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आदिवासी जमीन लाटल्याच्या आरोपांना बिनबुडाचे ठरवले आहे. तहसीलदारांच्या अहवालाचा दाखला देत नार्वेकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची घोषणाही त्यांनी केली.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्नीवर आदिवासी जमीन लाटल्याचा आणि दमदाटी केल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. हे आरोप तथ्यहीन असून, सूड भावनेने करण्यात आलेले असल्याचा दावा नार्वेकर यांनी केला. राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

नार्वेकर यांनी सांगितले की, २०१४ मध्ये संबंधित जमिनीच्या तत्कालीन मालकांमध्ये आणि स्थानिक आदिवासींमध्ये काही तक्रारी झाल्या होत्या. या तक्रारी मानवी हक्क आयोगाकडे सुनावणीसाठी गेल्या होत्या, ज्यासंदर्भात तहसीलदारांमार्फत चौकशी करण्यात आली. तहसीलदारांच्या १५/४/२०२५ च्या अहवालानुसार, संबंधित आदिवासी बांधवांनी स्वतः येऊन जबाबात सांगितले आहे की, त्यांना कोणतीही अडचण नाही. त्यांना मोबदला आणि पर्यायी पक्की घरे मिळाली आहेत. नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार, मूळ तक्रारीत किंवा त्यानंतर कधीही त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव नव्हते. राऊत केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत. नार्वेकर यांनी अशा बिनबुडाच्या आरोपांना गांभीर्याने न घेता राज्याच्या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

Published on: Nov 23, 2026 12:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us