Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात

Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात

| Updated on: Oct 07, 2026 | 7:22 PM

दिल्लीत काँग्रेसच्या लोकशाही वाचवा आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेण्यात आले. जंतर-मंतरकडे निघालेले खासदार अडवण्यात आले. प्रियांका गांधी रस्त्यावर झोपल्या आणि संविधानाची प्रत उंचावून निषेध नोंदवला. पोलिसांनी त्यांना उचलून बसमध्ये नेले, तर राहुल गांधींनाही ताब्यात घेतले. हा आरपारच्या लढाईचा निर्धार होता.

काँग्रेस पक्षाने दिल्लीत संविधान वाचवा आणि लोकशाही वाचवा या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले. जंतर-मंतरकडे निघालेल्या काँग्रेस खासदारांना दिल्ली पोलिसांनी वाटेतच अडवले. तीन बसेस भरून निघालेल्या खासदारांच्या बसेस बॅरिकेडिंग करून थांबवण्यात आल्या आणि त्यांच्या चाकांमधील हवा काढून टाकण्यात आली. यानंतर संतप्त झालेले राहुल गांधी आणि प्रियांका गांधी बसमधून खाली उतरले.

प्रियांका गांधी यांनी थेट रस्त्यावर झोपून निषेध नोंदवला, त्यांच्या हातात संविधानाची प्रत होती. “ही काही वागणूक आहे का? तुम्ही खासदारांना मारता,” असा सवाल त्यांनी विचारला. दिल्ली पोलिसांनी प्रियांका गांधींना अक्षरशः उचलून बसमध्ये नेले. यावेळीही त्यांनी संविधान उंचावून लोकशाही वाचवण्याचा संदेश दिला. राहुल गांधींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनाही उचलून बसमध्ये टाकण्यात आले. मोदी, शहा आणि ज्ञानेश कुमार यांनी लोकशाही हायजॅक केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. हे आंदोलन सुमारे तीन तास चालले, ज्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

Published on: Oct 07, 2026 7:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us