एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय… नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता… राज ठाकरेंचा मोठा दावा
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्याने अख्खा राज्यात खळबळ उडाली. शिंदेच्या या ऑपरेशन टायगरमुळे विविध चर्चांना उधाण आलं असून मनसे प्रमुख राज ठारे यांनीदेखील याविषयावर सविस्तर भाष्य केले. इतकेच नाही तर त्यानी एक खळबळजनक दावा केला आहे.
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्याने अख्खा राज्यात खळबळ उडाली. शिंदेच्या या ऑपरेशन टायगरमुळे विविध चर्चांना उधाण आलं असून काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ठाकरे गट आणि शिंदे गट, दोघांनीही यावरून एकमेकांवर यथेच्छ टीका केली. आता याच मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील पहिली प्रतिक्रिया आली आहे. 6 खासदार फुटले आणि ते शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्यांवरून राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले. SIR कडे दुर्लक्ष करून नका असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, भाजपबाबात बोलताना राज ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, भाजपमध्ये आतल्याआतच भयंकर घडतंय. नरेंद्र मोदी नावाचं मॅग्नेट तिथं आहे तेवढंच. ते गेलं तर सगळंच अस्तव्यस्त होईल. त्यामुळे ही अवस्था होत असताना तुम्ही जमिनीवर पाय रोवून स्थिर उभे रहा. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करु नका…;
