राज ठाकरे : काय आहे नेमकं FIR मध्ये ?

| Updated on: May 03, 2022 | 6:51 PM

राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या भाषणाच्या शेवटी त्यांनी भोंग्याचा मुद्दा उचलला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला पुन्हा डेडलाईन दिली आणि भोंग्यावरून इशारेही दिले. राज ठाकरे यांचं भाषण सुरू होत असताना अजान सुरू झाली.

Follow us on

औरंगाबाद: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या विरोधात एफआयआर (FIR)दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर विधान (Statement) केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या भाषणाच्या शेवटी त्यांनी भोंग्याचा मुद्दा उचलला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला पुन्हा डेडलाईन दिली आणि भोंग्यावरून इशारेही दिले. राज ठाकरे यांचं भाषण सुरू होत असताना अजान सुरू झाली. त्यावेळी राज ठाकरे यांनी पोलिसांना जाहीरपणे अजान बंद करण्याचं आवाहन केलं. त्याचवेळी त्यांनी चिथावणीखोर विधान केलं होतं. या विधानावरच पोलिसांनी आक्षेप घेतला असून राज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा कशासाठी दाखल केला याची माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.