अखेर बड्या नेत्याने सांगितलंच; ठाकरेंच्या खासदार फुटीत भाजपतचा… पक्षफुटीचं मोठं कारण समोर

अखेर बड्या नेत्याने सांगितलंच; ठाकरेंच्या खासदार फुटीत भाजपतचा… पक्षफुटीचं मोठं कारण समोर

| Updated on: Jun 18, 2026 | 3:47 PM

राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्यातील 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीच विजय मिळवेल असा विश्वास भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याच्या मुद्द्यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी भाजपचा या घडामोडींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पक्षातील अंतर्गत वाद आणि नाराजीमुळेच खासदार फुटत आहेत, मात्र त्यासाठी भाजपला जबाबदार धरणे हा त्यांचा कमकुवतपणा असल्याचे दानवे म्हणाले.

तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यांवरही त्यांनी निशाणा साधला. राऊतांची भाषा संयमी आणि चांगली असती तर आज उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती, हे एकदा नाही ते अनेक वेळा अशी खालच्या पातळीची भाषा वापरतात, असे वक्तव्य दानवे यांनी केले. दरम्यान, ऑपरेशन टायगरसारखा कोणताही प्लान भाजपकडे नसून तोडफोड करणे ही भाजपची संस्कृती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Jun 18, 2026 3:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us