Worli Sea Face Dolphin : मुंबईत पहिल्यांदाच समुद्रात डॉल्फिन, वरळी सी फेसचा VIDEO तर बघा..
मुंबईच्या वरळी सी फेसजवळ डॉल्फिनचे दुर्मिळ दर्शन झाले असून, त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. मुंबईकरांसाठी ही एक महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.
मुंबईतील वरळी सी फेसजवळ समुद्रात डॉल्फिनचे दुर्मिळ आणि मनमोहक दर्शन झाले आहे. वरळी सी फेस परिसरातील समुद्रात डॉल्फिन दिसल्याने मुंबईकरांमध्ये कुतूहल आणि आनंदाचे वातावरण आहे. या आधी मुंबईतील समुद्रात कधीही डॉल्फिन दिसले नव्हते. मात्र मुंबईत पहिल्यांदाच वरळी सी फेसजवळ समुद्रात डॉल्फिन पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. मुंबई आणि आसपासच्या समुद्राच्या या भागात यापूर्वी डॉल्फिन क्वचितच दिसले असल्याने, ही एक महत्त्वाची आणि अनपेक्षित घडामोड मानली जात आहे. सामान्यतः कोकणातील काही भागांमध्ये डॉल्फिनचे दर्शन होते आणि तिथे डॉल्फिन सफारी देखील चालवल्या जातात, मात्र मुंबईत हे दृश्य पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याचे सांगितले जात आहे.
Published on: Dec 03, 2025 12:34 PM
