Ravindra Dhangekar : मकोकावाला मला नोटीस देतोय तर पोलीस… पोलिसांच्या भूमिकेवर धंगेकरांचा सवाल

Ravindra Dhangekar : मकोकावाला मला नोटीस देतोय तर पोलीस… पोलिसांच्या भूमिकेवर धंगेकरांचा सवाल

| Updated on: Oct 14, 2025 | 5:56 PM

समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत मकोका आरोपी असल्याचे सिद्ध करण्याची मागणी केली आहे. यावर धंगेकर यांनी, "मकोकावाला मला नोटीस देत असेल तर पोलीस काय करतायत?" असा सवाल विचारला आहे.

समीर पाटील यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. धंगेकर हे मकोका कायद्याखालील आरोपी असल्याचा दावा पाटील यांनी केला असून, धंगेकरांनी हे सिद्ध करावे अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

धंगेकर म्हणाले की, “जर मकोका कायद्यातील आरोपी मला नोटीस देत असेल, तर पोलीस काय करत आहेत? माझ्यावर मकोका गुन्हेगार असल्याचा आरोप त्यांनी सिद्ध करावा.” पुढच्या एक ते दोन दिवसांत समीर पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्यास किंवा माफी न मागितल्यास तसेच नुकसान भरपाईच्या दाव्यावर कार्यवाही न केल्यास, कोर्टात गुन्हा दाखल करणार असल्याचे धंगेकर यांनी स्पष्ट केले.

धंगेकर यांनी या घटनेला लोकशाहीचा अपमान असे संबोधले आहे. “जर खंडणीखोर मकोकावाले मला नोटीस देत असतील आणि पोलीस चौकशी करत नसतील, त्यांना पोलीस ठाण्यात लाल कार्पेट अंथरले जात असेल तर सामान्य माणूस पोलिसांवर कसा विश्वास ठेवेल?” असा सवाल त्यांनी केला. अशा स्थितीत सामान्य नागरिक तक्रार घेऊन पोलीस चौकीत जाण्याऐवजी मार खाऊन घरी बसेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Published on: Oct 14, 2025 05:56 PM